'एनडीए'तून बाहेर पडलेले कुशवाह अखेर 'यूपीए'सोबत

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

"एनडीए'चे मित्र असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेन्द्र कुशवाह यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए'त प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

नवी दिल्ली :"एनडीए'चे मित्र असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेन्द्र कुशवाह यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए'त प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठोपाठ एनडीएतून बाहेर पडलेले कुशवाह हे दुसरे नेते आहे. महाराष्ट्रातही शिवसेना नाराज असली तरी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला न दुखावण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय मंत्रिपद भूषविलेले कुशवाह बिहारमधील एनडीएच्या ग्रॅन्ड एलायन्समध्ये होते. भाजपबरोबर सूत न जुळल्याने ते बाहेर पडले आहेत. 

कुशवाह यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यूपीएत जाण्याच निर्णय घेतला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितराम मांझी हे ही यूपीएत आहेत. आगामी निवडणुकीत लालू प्रसाद, कुशवाह, कॉंग्रेस आणि इतर पक्ष भाजप आणि नितीश कुमार यांच्या पक्षाविरोधात रान उठवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील लोकसभेच्या 40 जागापैकी 31 जागा एनडीएने जिंकल्या होत्या.

Web Title: upendra kushwah joined UPA