
UPITS 2025
Sakal
ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार शो (UPITS 2025) चा तिसरा अंक सोमवारी भव्य समारंभात संपन्न झाला. समारोपाचे मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल होते. त्यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा कार्यक्रम केवळ राज्याच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले.