
UPSC Prelims Result 2025 Out: संघ लोकसेवा आयोगानं पूर्व परीक्षा २०२५चा निकाल जाहीर केला आहे. यानंतर पुढच्या मुख्य परीक्षेसाठी १४१६१ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर चार उमेदवारांचे निकाल हे कोर्टात केस सुरु असल्यानं तुर्तास थांबवण्यात आले आहेत. जे पुढच्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत ते upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.