
Elon Musk: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील वादात प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी आज मवाळ भूमिका घेतली. मागील आठवड्यात ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या काही अतिशयोक्तीपूर्ण पोस्ट केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे मस्क यांनी ‘एक्स’वरून म्हटले आहे. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्या काही धोरणांना जाहीरपणे विरोध केला होता.