
Urea Shortage Farmer Beaten Unconscious by Police During Protest Shocking Case
Esakal
युरियाचा तुटवडा असल्यानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन थर्ड डिग्री देत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगनातील नालगोंडा जिल्ह्यात पोलिसांच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पीडित शेतकऱ्याचं नाव धनवत साई सिद्धू असं असून तो दरमचर्ला मंडलमधील कोठापेठ इथं राहतो.