'बुद्धाची मुर्ती फोडली म्हणूनच तालिबान...'; योगी आदित्यनाथांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'बुद्धाची मुर्ती फोडली म्हणूनच तालिबान...'; योगी आदित्यनाथांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

'बुद्धाची मुर्ती फोडली म्हणूनच तालिबान...'; योगी आदित्यनाथांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे, सत्ताधारी आणि विरोधक मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळात मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून होतो. असाच काहीसा एक प्रयत्न यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. त्यांनी अफगाणिस्तानातील बुद्ध मुर्तीचा संदर्भ देत दलित वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलंय की, तुम्ही पाहिलं असेल की, अमेरिकेने तालिबान्यांवर बॉम्ब टाकल्याने अनेक तालिबानी मारले गेले. गौतम बुद्धाची मुर्ती उद्ध्वस्त करण्याचीच शिक्षा देव त्यांना देत आहे, असं विधान त्यांनी लखनऊमधील सामाजिक प्रतिनिधी संमेलनात बोलताना केलंय.

हेही वाचा: 26 नक्षलींचा खात्मा! कसं घडलं ऑपरेशन? काय होती स्ट्रॅटेजी? वाचा सविस्तर

योगी आदित्यानथ यांनी म्हटलंय की, वीस वर्षांपूर्वी तालिबानने गौतम बुद्धांची मुर्ती फोडून उद्ध्वस्त केली. बामियानमधील ही अडीच हजार वर्षांपूर्वीची प्राचीन मुर्ती उद्धवस्त करतानाची दृश्ये तुम्ही पाहिली असतील. संपूर्ण जगाने तालिबानची ही क्रूरता पाहिली आहे.

पुढे ते म्हणाले की, बुद्धाने जगावर कधीच युद्ध लादलं नाही. बुद्ध नेहमीच मानवतेसाठी प्रेरणेचा स्त्रोत राहिला आहे. तसेच तो भक्तीचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, तालिबानने त्याची ही भव्य मुर्ती उद्ध्वस्त करण्याची कृती एकही भारतीय अथवा शांती आणि एकतेचा समर्थक हे कदापी विसरु शकणार नाहीये.

हेही वाचा: सोनू सूदची बहीण लढणार पंजाब विधानसभेची निवडणूक; पक्ष कोणता?

उत्तर प्रदेशच्या राजकारणात दलित-मुस्लिम हे दोन्ही घटक महत्त्वाचे मानले जातात. भाजपने आपलं संपूर्ण राजकारण मुस्लिम विरोधाचं केलं असलं तरी दलितांना आपल्याबाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न ते करत असतात.

loading image
go to top