

Gold silver Price Forecast this week
esakal
Gold Silver Price Forecast : भारतीय बाजारात गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पहायला मिळाली. मागच्या काही दिवसांपासून १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४० च्या आसपास आला होता तोच दर आठवड्याच्या शेवटी बाजार बंद होताना दिड लाखांवर गेला आहे. दरम्यान आठवड्याभरात सोन्याच्या दरात तब्बल ८ ते १० हजारांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर एमसीएक्सवरील चांदीच्या दरातही तेजी होऊन भाव २ लाख ३३ हजार रुपयांच्या खाली बंद झाला. भौतिक बाजारात सोन्याचा भाव सध्या १० ग्रॅममागे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर एक किलो चांदीचा भाव सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांच्या आसपास आहे.