esakal | Video : पाकिस्तान सावधान! आमच्याकडे आलंय 'अपाचे'
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पाकिस्तान सावधान! आमच्याकडे आलंय 'अपाचे'

अमेरिकन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचे नाव ‘अपाचे एएच-६४ई’ असे असून, आज पठाणकोट येथील एअरबेसमध्ये ही हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्यात आली. एअरबेसवर हवाई दलाच्या परंपरेनुसार या हेलिकॉप्टर्सना वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला.

Video : पाकिस्तान सावधान! आमच्याकडे आलंय 'अपाचे'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पठाणकोट (पंजाब) : भारतीय हवाई दलाची ताकद आज आणखी वाढली आहे. अमेरिकन बनावटीची आठ नवी लढाऊ हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत. दोन मिसाईल पॉड्ससह ही हेलिकॉप्टर्स शस्त्रूच्या ठिकाणांना बेचिराख करू शकतात.

अणु युद्धाची भाषा करणाऱ्या इमरान खान यांचे घूमजाव

काय म्हणाले हवाई दल प्रमुख?
अमेरिकन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचे नाव ‘अपाचे एएच-६४ई’ असे असून, आज पठाणकोट येथील एअरबेसमध्ये ही हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्यात आली. एअरबेसवर हवाई दलाच्या परंपरेनुसार या हेलिकॉप्टर्सना वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. यावेळी हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ प्रमुख उपस्थित होते. धनोआ म्हणाले, ‘सध्याच्या घडीला जगातील सर्वांत धोकादायक हेलिकॉप्टर्समध्ये अपाची हेलिकॉप्टरचा समावेश आहे. एकाचवेळी अनेक मोहिमांवर काम करण्याची क्षमतमा अपाची मध्ये आहे. आज अपाची हेलिकॉप्टरचा समावेश करून हवाई दलाने ताफ्यात अद्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्सची भर टाकली आहे.’

हवाई दलाकडे येणार २२ हेलिकॉप्टर्स
भारताने २०१५मध्ये अमेरिकेच्या बोइंग कंपनीशी अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा करार केला होता. या करारामध्ये शत्रूवर आग ओकणाऱ्या अशा २२ हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. ही हेलिकॉप्टर्स सध्याच्या घडीला जगातील सर्वांत अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आहेत. पहिल्या टप्प्यात आठ हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई दलात दाखल झाली आहेत. करारानुसार २०२०पर्यंत सर्व २२ हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहे.

कोणत्या देशांकडे आहे अपाचे हेलिकॉप्टर?
भारती हवाई दलात पहिल्यांदाच अपाचे हे अत्याधुनिक समाविष्ट होत आहे. पण, जगातील अनेक देशांकडे ही हेलिकॉप्टर्स  आहेत. यात अमेरिका, इजिप्त, ग्रीस, इंडोनेशिया, इस्राईल, जपान, कुवैत, नेदरलँड, कतार, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, ब्रिटन, यूएई आणि सिंगापूरसह एकूण १५ देशांकडे अपाची हेलिकॉप्टर आहेत.

कोठे झाला होता वापर?
दहशतवादाविरोधातील सर्वांत मोठी कारवाई अमेरिकेने पाकिस्तानात केली होती. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला त्याच्या घरात घुसून ठार करण्यात आले होते. त्या मोहिमेत अमेरिकेने अपाची हेलिकॉप्टरचा वापर केला होता.

काय आहेत अपाचे हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये?
- एका वेळी ५०० किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता
- साडे तीन तास हवेत राहण्याची हेलिकॉप्टरची इंधन क्षमता
- प्रति तास २८९ किलोमीटर वेगाने उड्डाण शक्य
- ३० एमएम गनमधून एका वेळी १२०० राऊंट फायर करणारी गन
- १९ मिसाईल्स कॅरी करून शकणारी दोन मिसाईल पॉड्स
- लेझर सिस्टम-सेंसर आणि नाईट व्हिजन सिस्टमचा समावेश
- त्यामुळे अंधारातही शत्रूवर हल्ला कररण्याची हेलिकॉप्टरची क्षमता

loading image
go to top