

India MARCOS Compared to US SEAL
Esakal
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुर असून ते थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. अमेरिकेच्या एका पायलटला इराणमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. यासाठी अमेरिकेनं खास त्यांच्या नौदलाचं SEAL पथक इराणमध्ये पाठवलं होतं. जगातलं हे सर्वात धोकादायक असं स्पेशल फोर्स मानलं जातं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, एक बेपत्ता झालेल्या अमेरिकेच्या क्रू मेंबरला अमेरिकन फोर्सनं वाचवलंय. आम्ही त्याला शोधलं. माझ्या सहकाऱ्यांनी गेल्या काही तासात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी अशी शोध मोहीम आणि बचाव कार्य राबवलं. आमच्या एका कर्नल असलेल्या अधिकाऱ्याला वाचवलं.