

Iran US Conflict
sakal
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात करारानंतर ६० दिवसांमध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या असताना, अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहानेदेखील इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबविण्यासाठी मांडण्यात आलेला ठराव मंजूर केला आहे. ५० विरुद्ध ४८ मतांनी मंगळवारी हा ठराव मंजूर झाला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या चार खासदारांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. ‘सिनेट’ने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करण्याची ही दहावी वेळ आहे.