रशियाशी कराराबाबत अमेरिका राजी होईल : भारत 

रशियाशी कराराबाबत अमेरिका राजी होईल : भारत 

नवी दिल्ली : रशियासमवेत 40 हजार कोटी रुपयांच्या अत्याधुनिक एस-400 क्षेपणास्त्र खरेदी करारासंदर्भात अमेरिकेला राजी करण्यात यश येईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. आगामी टू-प्लस-टू चर्चेत अमेरिकेबरोबर सकारात्मक चर्चा केली जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली.रशियावरील लष्करी निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने मत व्यक्त केले आहे. 

भारत आणि रशिया कराराला अमेरिका या निर्बंधातून सवलत देईल, असे भारताने म्हटले आहे. या करारामागची भूमिका भारताने अमेरिकेच्या कानावर घातली असल्याचे सांगत एस-400 क्षेपणास्त्र खरेदीचा करार अंतिम टप्प्यात असून, त्यावर वाटचाल सुरूच राहील, असे भारताने म्हटले आहे. अमेरिकेचे निर्बंध घालणारे नियम सीएएटीएसए (काउंटरिंग अमेरिका ऍडव्हायजरी थ्रू सेक्‍शन ऍक्‍ट) लागू करण्यापूर्वीच करार प्रक्रिया पुढे गेली असल्याचे भारताने सांगितले.

एस-400 क्षेपणास्त्र पद्धत विकसित करण्यासंदर्भात करार केला जात असून हे सिस्टीम लढाऊ विमान, प्लेन, क्षेपणास्त्र आणि ड्रोनला नष्ट करण्यात तरजेब आहे. 400 किलोमीटर दूर आणि 30 किलोमीटर उंचीपर्यंत हे क्षेपणास्त्र आपले लक्ष्य भेदू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com