US Lawmakers Move Resolution Against Tariffs on India
sakal
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन (पीटीआय) : भारतावर अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त आयातशुल्काला लगाम घालण्यासाठी अमेरिकेतील तीन प्रभावशाली खासदारांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये ठराव सादर केला आहे. ‘भारताविरुद्ध बेजबाबदारपणे शुल्क आकारण्याचे धोरण प्रतिकूल असून, यामुळे भारत-अमेरिकेतील भागीदारी कमकुवत होण्याची शक्यता आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या डेबराह रॉस, टेक्सासचे मार्क वेसी आणि इलिनॉयचे राजा कृष्णमूर्ती यांनी शुक्रवारी प्रतिनिधीगृहात ठराव सादर केला.