"गुन्हेगारांना ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार' 

पीटीआय
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018


सीसीटीव्हीच्या साह्याने गुन्हेगारांचा माग काढता येतो. मात्र, काही वेळेस त्यांचे चेहरे ओळखणे अशक्‍य असते. त्यामुळे चेहरे ओळखणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

नवी दिल्ली : पोलिसांकडे अद्याप नोंद नसलेल्या गुन्हेगारांना सोशल मीडियाद्वारे ओळखून शोधून काढण्यासाठी तपास संस्था नवीन सॉफ्टवेअर आणि चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (फेस रेकग्निशन) मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली. सायबर गुन्हे हे सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याचेही ते म्हणाले. 

राजनाथसिंह यांनी आज संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन केले. या वेळी झालेल्या भाषणादरम्यान ते म्हणाले, की सध्या दहशतवादी "डार्क इंटरनेट'चा वापर करून गुन्हेगारांबाबतची माहिती खरेदी-विक्री करत आहेत. त्यामुळेच ही माहिती मिळविण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा विभाग सुरू केला असून, त्याअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गुन्हेगारांचा माग काढला जात आहे. नक्षलवादविरोधी मोहिमांमध्ये ड्रोनचा मोठा उपयोग झाल्याने दहशतवादविरोधी मोहिमांसाठीही सुरक्षा दलांना ड्रोनचा उपयोग होईल, असा विश्‍वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use the latest technology to identify criminals says Rajnath Singh