तेलंगणातील निवडणुकीत नोटाचा वापर वाढला

पीटीआय
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

हैदराबाद : तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नोटाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 47 टक्के म्हणजे दोन लाख 25 हजार जणांनी नोटाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

या मतदानाच्या वेळी एकूण दोन लाख 24 हजार 709 जणांनी नोटाचे बटण दाबल्याचे स्पष्ट झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत दीड लाख मतदारांनी नोटाचा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले होते. सात डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात एकूण दोन कोटी 5 लाख मतदारांनी आपला हक्क बजाविला. त्यातील 1.1 टक्का मतदारांनी नोटाचा वापर केला. या मतदानाच्या वेळी नोटाचा वापर जेवढ्या मतदारांनी केला त्याच्यापेक्षा कमी मते भाजपच्या 15 उमेदवारांना मिळाली. पक्षाने यंदा 118 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात केवळ एकाच जागेवर त्यांना विजय मिळविता आला. 
 
Web Title: Use of the NOTA is Increases in Telangana elections