गायक मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड फरार; फेक पासपोर्टचा केला वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sidhu moose wala was shot
गायक मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड फरार; फेक पासपोर्टचा केला वापर

गायक मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड फरार; फेक पासपोर्टचा केला वापर

नवी दिल्ली : गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाईंड सचिन तपन हा परदेशात पळून गेला आहे. फेक पासपोर्ट बनवून तो फरार झाला आहे. फेक पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यामधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. (Using fake passport Moose Wala murder plotter Sachin Thapan fled India)

तपनने फोटोमध्ये बदल घडवून आणणाऱ्या सॉफ्टवेअरचा आणि ओळखीसाठी बनावट कागदपत्रांचा यासाठी वापर केला, अशी माहिती साऊ दिल्लीच्या डीसीपी मेरी जयकेर यांनी ही माहिती दिली. आत्तापर्यंतच्या आमच्या तपासात मात्र, मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचण्यात गुप्तता पाळल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा आम्हाला आढळला नाही, असंही डीसीपींनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात पुढे आले, की मुसेवालाच्या हत्येपूर्वी त्याच्या बुलेटप्रूफ गाडीचीही रेकी करण्यात आली होती. बिश्नोई आणि गोल्डी बरारच्या शुटर्सने जालंधरमध्ये जाऊन सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीची काच किती एमएमची आहे ही माहिती मिळवली होती. वास्तविक बुलेटप्रूफ गाडी जालंधरमध्ये बनवली जाते. मुसेवाला यांची गाडीही तेथेच बनवली गेली होती. हत्येपूर्वी पूर्ण नियोजन आखण्यात आले होते.