Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; पंतप्रधान कार्यालयाची घोषणा

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे हे देशातून पळून गेले आहेत. त्यामुळं इथंले नागरिक अधिकच आक्रमक झाले आहेत.
Sri Lanka_emergency
Sri Lanka_emergency

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशातून पळून गेल्यानं आता इथं आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयानं याची घोषणा केल्याचं एएफपी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. (Sri Lanka declares state of emergency)

राष्ट्रपती राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा न देता ते देशातून मालदीवला पळून गेल्यानं श्रीलंकन जनता संतप्त झाली असून लोकं आपल्या हातात देशाचे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरले आहेत. काही आंदोलक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान कार्यालयाकडे चाल केली आहे.

Sri Lanka_emergency
मुर्मू भारताच्या दुष्ट तत्वज्ञानाचं प्रतिनिधित्व करतात; काँग्रेस नेत्याचं आक्षेपार्ह विधान

आंदोलकांवर नियंत्रण मिळवण आता कठीण होऊन बसल्यानं श्रीलंकेत पु्न्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयानं याची अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, कोलंबोतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंदोलकांनीही सैन्याचा सामना करण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यांवर विशिष्ट मास्क चढवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com