उत्तर प्रदेशमध्ये 17 पासून कर्जमाफी योजना कार्यान्वित

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

लखनौ: उत्तर प्रदेशातील बहुप्रतीक्षित कर्जमाफी योजना 17 ऑगस्टपासून मूर्त स्वरूपात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत लखनौ जिल्ह्यातील सुमारे 9 हजार 500 कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही योजना सुरवातीला लखनौत राबवण्यात येणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी राबवण्यात येणार आहे.

येत्या 17 ऑगस्टला लखनौतील स्मृती उपवन येथे कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अन्य जिल्ह्यातील शेतकरी तसेच मंत्री, खासदार, आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांकडे आधारकार्ड आहे, त्यांना लाभ दिला जाणार जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही परंतु जमिनीबाबत कोणताही वाद नाही अशा शेतकऱ्यांना माफी दिली जाणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात जमिनीच्या वाद असणाऱ्या शेतकऱ्यांसंबंधी अडचणी निकालात काढून कर्जमाफी दिली जाणार आहे. 17 ऑगस्ट रोजी आधारकार्ड असणाऱ्या 9 हजार 500 शेतकऱ्यांचे आधार लिंक बॅंक खात्याशी केले जाणार असून कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारने 75 जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यूपी सरकारने कर्जमाफीची संपूर्ण तयारी केली असून, त्या संदर्भात बॅंक अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी सांगितले.

कर्जमाफी योजनाचा लाभ

  • 17 ऑगस्टपासून कार्यान्वित
  • एक सप्टेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने लागू
  • राज्यातील 86 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्‍यता
  • शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार
  • सरकारकडून 34 हजार कोटींची तरतूद
Web Title: uttar prades news Debt waiver scheme implemented