उत्तर प्रदेश: पोलिस चकमकीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

इटावह (उत्तर प्रदेश): समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या हत्येशी संबंधित असलेला एक सराईत गुन्हेगार पोलिसांबरोबरील चकमकीत ठार झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. या चकमकीत तीन पोलिसही जखमी झाले.

काल रात्री ही चकमक झाली. याबाबत माहिती मिळताच पोलिस आणि विशेष कारवाई पथकाने काक्राइया पुलाकडे धाव घेत चार मोटारसायकलस्वारांना आव्हान दिले, असे पोलिस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले.

या चकमकीदरम्यान एक गुन्हेगार जखमी झाला. त्याला अटक करण्यात आली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले, तर अन्य गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला. या चकमकीत मरण पावलेल्या गुन्हेगाराचे नाव सुरेंद्र सिंह असे असून, त्याच्यावर 15 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. सुरेंद्र सिंह याने समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते राजबीर सिंह यांची 30 मे रोजी हत्या केली होती. त्यानंतर 16 जून रोजी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र तो पोलिस कोठडीतून पळून गेला होता, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: uttar prades news Police firing death of Saraiite criminal