'यूपी 100' योजनेला प्रारंभ

यूएनआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज "यूपी 100' या महत्त्वाकांशी योजनेचा प्रारंभ केला. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांकडून मदत मिळविण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे कोणीही 100 क्रमांकावर फोन केल्यानंतर अथवा संदेश पाठविल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत त्याला मदत मिळू शकते.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ही प्रणाली मदतनीस ठरणार असून, याद्वारे राज्य पोलिस दल गुन्हा झालेल्या ठिकाणी किंवा आवश्‍यक त्या ठिकाणी केवळ 20 मिनिटांत पोचणार आहेत. आज पहिल्यांदा या प्रणालीची सुरवात शहीद पथ येथे मुख्यमंत्र्यांच्या इमारतीजवळ करण्यात आली. त्यानंतर ते बरैलीला रवाना झाले. या प्रणालीची सुरवात उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, आग्रा, अलाहाबाद, वाराणसी, बरैली, गोरखपूर, झाशी, मेरठ, मोरादाबाद आणि रामपूर याअ 11 जिल्ह्यांत करण्यात आली. यासाठीच्या कॉल सेंटरवर 100 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आग्रा आणि वाराणसी येथे दोन उपकेंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. या उपक्रमाद्वारे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांवर लक्ष ठेवण्यात येणार असून, कमीत कमी वेळात मदत पोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमावर असलेल्या सर्व दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

अशी आहे यंत्रणा
75 जिल्ह्यात राबविणार
3,200 चारचाकी गाड्या
1,600 दुचाकी गाड्या

Web Title: uttar pradesh 100 scheme start