
गोंडा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील गोंडा येथील सिहागाव-खरगपूर रस्त्याजवळ एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारचे नियंत्रण सुटल्याने ती शरयू नदीच्या कालव्यात पडली. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी बहुतेक जण एकाच कुटुंबातील होते. मृतांमध्ये सहा महिला, दोन पुरुष आणि तीन मुलांचा समावेश आहे.