UP Election: योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adityanath Yogi

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवण्याची शक्यता

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मागील निवडणुकीत कसल्याही अडचणीशिवाय मताधिक्याने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला या निवडणुकीपूर्वीच धक्क्यांवर धक्के बसत आहेत. गेल्या एका महिन्यापासून अनेक आमदारांनी तसेच मंत्र्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यूपीचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे अयोध्या (Ayodhya) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सध्या यूपीमध्ये भाजपकडून (Bharatiya Janata Party - BJP) तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

हेही वाचा: नागालँडमधील हिंसक घटनेची चौकशी सुरू - लष्करप्रमुख नरवणे

1990 च्या दशकात भाजपच्या राम मंदीर उभारणीच्या मोहिमेनेच पक्षाला पहिल्यांदा सत्तेची शिडी चढवली होती. त्यानंतर 2019 मध्ये अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मोकळा झाला आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मतदार संघ अत्यंत सुरक्षित आणि हक्काचा मानला जातो.

विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या उत्तर प्रदेशातील कोअर कमिटीची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. या बैठकीमधील पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितलंय की, अयोध्येतून आदित्यनाथ यांच्या उमेदवारीचा मुद्दा बैठकीत चर्चेसाठी आला आहे.

हेही वाचा: योगींना दुसरा झटका! आणखी एका मंत्र्याने दिला राजीनामा

यूपीमध्ये येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये 403 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये लढत होण्याची चिन्हे आहेत. 10 फेब्रुवारी ते सात मार्चपर्यंत सात टप्प्यात पार पडणाऱ्या या मतदानाच्या प्रक्रियेचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे.

दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारमधील मंत्री दारा सिंह चौहान यांनी आता मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. याआधी कालच मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा देत भाजप पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांच्याशिवाय आणखी तीन आमदारांनी काल पक्षाला अलविदा केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top