जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी अटकेत; एटीएसची कारवाई

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

एटीएसकडून सर्वत्र कसून तपास केला जात आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. देशभरातील सर्व राज्य आणि दहशतवादविरोधी पथकांकडून (एटीएस) दक्षता बाळगण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर एटीएसकडून सर्वत्र कसून तपास केला जात आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सहारनपूर येथून जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. आबिक अहमद मलिक आणि शाहनवाझ अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील शाहनवाझ हा मूळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना भरती करत असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत, असे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, आबिक आणि शाहनवाझ या दोघांना अटक केली असून, लवकरच या दोघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh ATS arrest two jaish e mohammed terrorists from Deoband in Uttar Pradesh