

UP
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत तब्बल २४ महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत सरकारी वकिलांच्या मानधनात आणि भत्त्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय शेतकऱ्यांसाठी मक्याचा किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करण्यात आला असून, तुरुंग विभाग, पाटबंधारे, उत्पादन शुल्क, कृषी, नमामि गंगे आणि मुद्रांक नोंदणी विभागाच्या अनेक कल्याणकारी योजनांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.