बलरामपूर : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात अलीकडेच बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा उर्फ पीर बाबाविषयी (Changur Baba Case) धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या छांगूर बाबा आणि नीतू उर्फ नसरीन हे दोघे ७ दिवसांच्या एटीएस रिमांडवर (ATS Remand) असून, अनेक तपास यंत्रणा त्यांची चौकशी करत आहेत.