
Jaunpur Man Death
ESakal
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे एक लग्न अपूर्ण राहिले. महिलेने पाहिलेली स्वप्ने क्षणार्धात भंगली. महिलेचे आयुष्य सुरूही झाले नव्हते आणि त्याआधीच संपले. ३५ वर्षांच्या महिलेचे लग्न ७५ वर्षांच्या पुरुषासोबत होते. महिलेचे हे दुसरे लग्न होते. तिला मुलेही होती. त्या वृद्धाला मुले नव्हती, त्याची पहिली पत्नी वारली होती. नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्याने लग्न केले. पण लग्नाच्या रात्रीच त्याचे निधन झाले. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.