
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात सून आणि सासऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सून फरशी पुसत असल्याचे सांगण्यात येत आहे. सासरे बाहेरून घरी आले. त्यांच्या बुटांवर चिखल होता. चिखलामुळे फरशी घाणेरडी झाली. हे पाहून सुनेचा राग आला. तिने काठी उचलली आणि तिच्या वृद्ध सासऱ्यांना मारहाण करू लागली. भांडणानंतर सून खोलीत गेली आणि भयानक पाऊल उचलले.