Uttar Pradesh Crime News: प्रेमी युगुलाचा करूण अंत! टोकाचा निर्णय घेत संपवलं जीवन; कुटुंबियांकडून दोघांची हत्या झाल्याचा संशय

Uttar Pradesh Crime news: सैदंगली परिसरातील गावात आंब्याच्या झाडाला प्रेमीयुगलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मुलगी नववीत शिकत असून तरुणाचे वय वीस वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsEsakal
Updated on

सैदंगली परिसरातील गावात आंब्याच्या झाडाला प्रेमीयुगलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मुलगी नववीत शिकत असून तरुणाचे वय वीस वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह झाडावरून काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या दोघांची हत्या झाल्याचा संशय तरुणाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.(Uttar Pradesh Crime News)

सैदंगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैदरा मिलक गावात राहणारा 20 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. दोघेही सुमारे दोन वर्षांपासून सोबत होते आणि त्यांना लग्न करायचे होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दोघांच्या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. यादरम्यान ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला जात आहे. या तरुणाचे गावातील एका १६ वर्षीय तरुणीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही अनुसूचित जातीचे होते. मुलगी नववीत शिकत होती.

Uttar Pradesh Crime News
PM Modi: 2004 ची चूक करु नका; पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना काय केल्या सूचना?

गेल्या तीन दिवसांपासून ही मुलगी घरातून बेपत्ता होती आणि तरुणही घरातून बेपत्ता होता. कुटुंबीय दोघांचा शोध घेत होते. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यासाठी कुटुंबीयही शनिवारी रात्री पोलिस ठाण्यात गेले होते. मुलगी बेपत्ता झाल्याचा आरोप तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांवर करण्यात आला. पोलिस या दोघांचाही शोध घेत होते.

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गावापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या आंब्याच्या बागेत दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. संबधित माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांची गर्दी झाली. तरुणाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे.

Uttar Pradesh Crime News
Bullet Train : रेल्वेच्या दोन विभागातील विवादामुळे अडकलं बुलेट ट्रेनचं काम; गुजरातमध्येच मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला खोडा

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून झाडाला लटकलेले दोन्ही मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवले. सीओ दीप कुमार पंत यांनी सांगितले की, दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे असल्याचे दिसून येत आहे. तपास केला जात आहे. लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल.

Uttar Pradesh Crime News
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी काँग्रेसला का दूर करत आहेत ? कोणत्या गोष्टीची वाटतेय भीती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com