Girlfriend Beating Girl
ESakal
देश
Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?
Girlfriend Beating Girl News: एका तरुणीने प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला. यामुळे प्रेयसीला राग आला. यानंतर त्यांच्यात जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमधील परतापूर पोलीस स्टेशन परिसरातील दिल्ली-डेहराडून बायपासवर असलेल्या एका शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनींमध्ये वाद झाला. एमआयईटीच्या क्रीडांगणात सूर्यस्नान करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने गोंधळ उडाला. किरकोळ वादाचे रूपांतर दोन विद्यार्थिनींमध्ये अचानक झालेल्या शारीरिक हाणामारीत झाले. मुलींनी एकमेकांचे केस ओढले, ज्यामुळे त्या पडल्या.

