Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Airport Homeguard Suicide: विमानतळावरच एक खळबळजनक घटना घडल्याचे दिसून आले आहे. होमगार्डने जीवन संपवले आहे. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Airport Homeguard Suicide

Airport Homeguard Suicide

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एटीसी उपकरणांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या होमगार्डचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. मृताचे नाव विक्रम सिंग असे आहे. तो मूळचा इटावा जिल्ह्यातील रहिवासी होता. सध्या तो लखनऊमधील सरोजिनी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गहरू येथे त्याच्या कुटुंबासह राहत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com