

wife elopes with nephew
ESakal
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी तिच्या भाच्यासोबत पळून गेल्यानंतर एका व्यक्तीने तिच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. ही घटना कुलपहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुगीरा गावात घडली आहे.