

husband killed wife
ESakal
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या चार महिन्यांतच एका पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. घटनेच्या काही तासांनंतर आरोपीने महाराजपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास सुरू केला आहे. महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुमा परिसरात असलेल्या न्यू हाय-टेक सिटीमधील मुस्कान हॉस्पिटलच्या वरच्या भाड्याच्या खोलीत ही घटना घडली.