

Mother Torture Son Fatehpur
ESakal
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलवामऊ गावातून माणुसकीला हादरवून टाकणारे एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका आईवर केवळ ५ रुपयांच्या वादातून आपल्याच निष्पाप मुलावर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप आहे. मुलाने १५ रुपयांचा गुटखा २० रुपयांना विकत घेतला आणि त्यावर ५ रुपये खर्च केले. त्यामुळे संतप्त आईने आधी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर गरम सुरीने त्याचे दोन्ही तळवे चटके दिले.