

Influencer Vanshika Assaults Mother
ESakal
उत्तर प्रदेशातील हापूर येथील रहिवासी असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वंशिका आता केवळ तिच्या रील्स आणि म्युझिक व्हिडिओंसाठीच नाही तर तिच्या आईवर झालेल्या कथित हल्ल्यासाठी देखील ट्रेंडिंग करत आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये वंशिका तिच्या आईला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. या घटनेनंतर आईने तिच्या मुलीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिच्यावर मारहाण, धमक्या आणि गैरवर्तनाचा आरोप केला.