School Crime News: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Sambhal Teacher Slaps Student News: पब्लिक स्कूलमधील इयत्ता पहिलीच्या एका विद्यार्थ्यावर पुस्तक न आणल्याबद्दल शिक्षकाने कानशिलात मारल्याने दात तुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
School teacher accused of assaulting student

Sambhal Teacher Slaps Student

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील दिल्ली दरवाजा येथील सेंट जिलानी पब्लिक स्कूलमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इयत्ता पहिलीच्या एका विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तक न आणल्याने संतापलेल्या एका महिला शिक्षिकेने त्याला कानशिलात मारल्याचा आरोप आहे. कानशिलात इतक्या जोरात मारली गेली की, त्या मुलाचा एक दात तुटला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com