उत्तर प्रदेशातील अलिगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका पती-पत्नीत साबणावरून भांडण झाले. या प्रकरणात पोलीसही घरी आले आणि पतीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. जिथे त्याला मारहाण करण्यात आली. क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरातील संजय गांधी कॉलनीत राहणाऱ्या पुष्पा हिने तिच्या सूनवर तिच्या मुलाशी दररोज भांडण करण्याचा आरोप केला आहे.