
Haldwani Youth Suicide
ESakal
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या वडिलांसमोर चाकूने गळा चिरून आत्महत्या केली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या तरुणाचे नाव सजल जोशी होते. मरण्यापूर्वी त्याने युट्यूबवर ६.३२ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्याने हे भयानक पाऊल का उचलणार आहे हे स्पष्ट केले.