
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये दोन तरुण गुगल मॅप्सच्या मदतीने कारने मित्राच्या घरी जात होते. गुगल मॅपवरील लोकेशन त्यांना एका शेतात घेऊन गेले आणि त्यांची गाडी तिथेच अडकली. रात्रीची वेळ असल्याने त्याने काही तरुणांना मदतीसाठी बोलावले. पण मदतीला आलेल्या तरुणाने त्याची गाडी आणि मोबाईल लुटून पळ काढला. आता पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.