भाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; "ठग'बंधन 

महेश काशीद
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

"55 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही. ते अवघ्या 55 महिन्यांमध्ये पंतप्रधांनी करून दाखविले. त्यासाठी विरोधकांची चिंता वाढली आहे. महागठबंधनासाठी तयारी सुरु आहे. भाजपत्तर पक्षांची मोट बांधली जात आहे. पण, हे ठगांनी बांधलेली मोट आहे. यामुळे महागठबंधन म्हणजे ठगबंधन आहे.'' 

बेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क "ठग'बंधन असल्याची टीका उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे. 

भाजपतर्फे आज (ता.18) शक्तीकेंद्र प्रमुखांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मौर्य बोलत होते. गांधीभवन सभागृहात कार्यक्रम झाला.

श्री मौर्य म्हणाले,""लोकसभेची निवडणूक सुशासनविरुध्द कुशासन आहे. स्वच्छ प्रतिमेच्या रुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला लाभले आहेत. भाजपच्या पाठीशी जनता, मोदीभक्त आहेत. 55 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही. ते अवघ्या 55 महिन्यांमध्ये पंतप्रधांनी करून दाखविले. त्यासाठी विरोधकांची चिंता वाढली आहे. महागठबंधनासाठी तयारी सुरु आहे. भाजपत्तर पक्षांची मोट बांधली जात आहे. पण, हे ठगांनी बांधलेली मोट आहे. यामुळे महागठबंधन म्हणजे ठगबंधन आहे.'' 

कर्नाटकातील अस्थिर सरकारवरही जोरदार हल्ला मौर्य यांनी चढविला. त्यांनी काँग्रेस - धजद युती सरकार भ्रष्टाचाराचे कुरण ठरले. राज्यातील जनतेशी त्यांना काही देणे घेणे नाही. शिवाय कधीही सरकार कोसळू शकते, त्याची चांगली कल्पना आहे. त्यासाठी जितके दिवस सत्तेत आहे. तितके दिवस खोऱ्यांनी पैसे ओढण्याचा चंग बांधला आहे. या नेत्यांची जागा कारागृहात आहे, अशी टीका केली. 

यावेळी खासदार डॉ. प्रभाकर कोरे देशाचे प्रतिनिधीत्व आणखी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे, असे देशातील जनतेची इच्छा आहे. एकहाती सत्ता पक्षाला मिळवून द्यावी, असे आवाहन केले आहे. खासदार सुरेश अंगडी यांनी प्रास्तावीक केले.

यावेळी आमदार महांतेश कवठगीमठ, अभय पाटील, अॅड. अनिल बेनके, हणमंत निराणी, माजी आमदार विश्‍वनाथ पाटील, संजय पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन इराण्णा कडाडी यांनी केले. 

Web Title: Uttar Pradesh Deputy Chief Minister Keshav Prasad Mourya