A representative image showing a court verdict related to a government job fraud case in Uttar Pradesh where an accused was sentenced to seven years in jail for holding two government jobs simultaneously for over three decades.

esakal

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

Government Job Scam : जवळपास ३३ वर्षे दोन्ही विभागांकडून पगार व सरकारी लाभ घेतल्याचे तपासात समोर आले.आरटीआयमधून माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले.
Published on

उत्तर प्रदेशातील बारांबकी येथे एक थक्क करणारे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करुन दोन वेगवेगळ्या सरकारी विभागात एकाचवेळी दोन नोकऱ्या केल्याचे उघड झाले आहे.दोन्ही विभागांकडून जवळपास ३३ वर्षे पगार आणि इतर लाभ मिळवणाऱ्या या आरोपीला न्यायालयाने आता सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला ३०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या आरोपीला काही वर्षांपूर्वीच त्याच्या पदावरून बडतर्फ करण्यात आले होते; त्यानंतर आता न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com