जामिया, एएमयूनंतर आता लखनौमध्येही हिंसक आंदोलन

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत संतप्त आंदोलकांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठाबाहेर चार बस पेटवून दिल्या. आंदोलकांनी केलेली दगडफेक, मारहाणीत सहा पोलिसही जखमी झाले आहेत, या राड्यामध्ये जखमी झालेल्या 35 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

लखनौ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (कॅब) दिल्लीतील जामिया, अलिगढमधील मुस्लिम विद्यापीठात सुरु असलेल्या आंदोलनाचे लोण आता लखनौमध्ये पोहचले असून, नदवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत संतप्त आंदोलकांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठाबाहेर चार बस पेटवून दिल्या. आंदोलकांनी केलेली दगडफेक, मारहाणीत सहा पोलिसही जखमी झाले आहेत, या राड्यामध्ये जखमी झालेल्या 35 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पोलिसांनी परिसर मोकळा करण्यास सुरवात केली आहे. आता लखनौमध्येही आंदोलन झाले आहे.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

लखनौमधील नदन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध करत मार्च काढला. पण, पोलिसांनी त्यांना अडविल्याने पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही कारवाई केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गेटवरच आंदोलक विद्यार्थ्यांना रोखून धरले. विद्यार्थ्यांच्या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh Due To Violent Protest Internet Services Stopped In Aligarh And Saharanpur