Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार.
  Elecation
Elecationsakal

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, निवडणुक अयोगाने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. 4 मे आणि 11 मे रोजी दोन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.

रविवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. याअंतर्गत निवडणूक अधिकारी 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याची अधिसूचना आणि 17 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी करतील.

पहिल्या टप्प्यासाठी 11 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रे खरेदी आणि सादर करण्याची मुदत असेल. आणि दुसऱ्या टप्प्यासाठी, ते 17 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान असेल.

पहिल्या टप्प्यासाठी 18 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 25 एप्रिल रोजी सूचना पत्रांची छाननी होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 20 एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 27 एप्रिलला नामांकन मागे घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील चिन्हांचे वाटप २१ एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील चिन्हांचे वाटप २८ एप्रिलला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com