पाण्याची पाईप फोडली म्हणून दलित तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime Newsesakal
Summary

आरोपींनी दलित तरुणाला बेदम मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केलीय.

आग्रा (Agra) जिल्ह्यातील मैनपुरीमधील (Mainpuri) तरिहा रामनगर गावात (Tariha Ramnagar village) बुधवारी एका दलित तरुणाला उच्चवर्णीय लोकांनी मारहाण केली आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या भावानं सवर्णांच्या शेतातील पाण्याचे पाइप खराब केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर (Agra Police) दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नरेगामध्ये (National Rural Employment Guarantee Act) काम करणारे पीडित शैलेंद्र कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'आठवड्यापूर्वी त्याच्या भावाच्या दुचाकीनं पाण्याचा पाइप चुकून खराब केला, त्यामुळं उच्चवर्णीय लोकांनी त्याला मारहाण केलीय.'

पीडित शैलेंद्र कुमारनं सांगितलं की, बुधवारी कामावर जात असताना चार आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक मारहाण करताना दिसत आहेत. तर, पीडित रडताना आणि त्याला हाकलवून दिलं जात आहे. दरम्यान, काही स्थानिक लोकांनी मध्यस्थी करून त्याला वाचवलंय.

Uttar Pradesh Crime News
मोबाईल चार्जरच्या केबलनं पतीनं पत्नीचा गळा आवळून केला खून

पीडितेनं कप्तान सिंग चौहान आणि त्यांची मुलं मोहित चौहान, कन्हैया सिंग चौहान आणि सुधीर दीक्षित यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संदर्भात डेप्युटी एसपी चंद्रकेश सिंह (Deputy SP Chandrakesh Singh) यांनी सांगितलं की, किशनी पोलिस स्टेशनमध्ये (Kishni Police) आयपीसीच्या कलम 323 आणि 504 आणि एससी/एसटी कायद्याच्या कलमांनुसार चार लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com