दिल्ली,हरियाणानंतर उत्तर प्रदेशाला प्रदूषणाचा विळखा; 21 नोव्हेंबर पर्यत शाळा,काॅलेज बंद : Gautam Buddha Nagar Pollution | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीत फुटला प्रदूषणाचा ‘बाँब’

सध्या जागतिक पातळीवर अनेक शहरांमध्येही प्रदूषणाचा विळखा घट होऊ लागला आहे.

दिल्ली,हरियाणानंतर उत्तर प्रदेशाला प्रदूषणाचा विळखा; शाळा,काॅलेज बंद

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

दिल्लीतील (Delhi) प्रदूषणानंतर आता उत्तर प्रदेशातील गौतमबुध्द नगरातील (Gautambuddha Town Uttar Pradesh) शाळा आणि काॅलेज २१ नोव्हेंबर पर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालये सुरु राहणार आहेत.

सध्या जागतिक पातळीवर अनेक शहरांमध्येही प्रदूषणाचा विळखा घट होऊ लागला आहे. चीनसह (China) काही देशांमध्ये लॉक डाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. या प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हीच स्थिती आता देशातही निर्माण होऊ लागली आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या कारणावरून अनेक दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. अशीच स्थिती हरियाणामध्ये (Haryana) होती. यामुळे दिल्ली आणि हरीयानात शाळा, काॅलेज बंद ठेवण्यात आले आहेत. यानंतर आता उत्तर प्रदेशातील शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमबुध्द नगरचे जिल्हाधिकारी सुहास.एल.वाई यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली.

हेही वाचा: मुंबईत रेल्वे स्थानकात 'पॉड हॉटेल'; कमी दरात मिळणार रूम

प्रदूषणा संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच दिला होता. यासाठी आज अखेर पर्यत वेळ देण्यात आली होती. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे मुलांना शाळेत पाठवू नये या मताशी पालक सहमत होते.

loading image
go to top