'बकरी ईदला कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या'

वृत्तसंस्था
Tuesday, 28 July 2020

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या मुलांची द्या,” असे धक्कादायक भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केले आहे. शिवाय, कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश): “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या मुलांची द्या,” असे धक्कादायक भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केले आहे. शिवाय, कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मांजरीच्या पिल्लावर सामूहिक बलात्कार अन्...

प्रसारमाध्यमांशी बोलताना नंदकिशोर गुर्जर म्हणाले, 'सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण आता त्याऐवजी नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे इस्लाम धर्म मानणाऱ्यांना माझी विनंती आहे. ते देखील आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी. निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचे सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावे लागेल आणि लोक त्याला खातील. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला भोगावे लागते.'

Video: नारळाच्या झाडावर साप कसा चढतोय पाहा...

दरम्यान, देशात सध्या कोरोनाने थैमान घातले असून, अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेले नाही. संकटाच्या या काळात सरकार वारंवार नागरिकांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करत आहे. शिवाय, बकरी ईद आणि इतर सण घरातच साजरे करण्याचे आवाहन केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh ghaziabad bjp mla nandkishore gurjar controversial statement on bakri eid