

UP Business Law Reforms
ESakal
उत्तर प्रदेश सरकारने उद्योग आणि व्यवसायाला दिलासा देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने "उत्तर प्रदेश सुलभ व्यापार अध्यादेश, २०२५" ला मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या परिसंवादातून पारित झालेल्या या अध्यादेशामुळे राज्यात लागू असलेल्या १३ प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक कायद्यांमधून जवळपास ९९ टक्के गुन्हेगारी तरतुदी काढून टाकल्या जातात.