बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय

वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

उत्तर प्रदेश सरकारने मशिदीच्या उभारणीसाठी मुस्लीम पक्षकारांना नवीन जागा देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पाच जागांची पाहणीही करण्यात आली आहे. मात्र जो अयोध्याचा पवित्र प्रदेश मानला जातो, त्या प्रदेशाच्या बाहेर जमिनी आहेत. पंचकोशी परिक्रमा हा 15 किमीचा परिघ आहे. सध्या प्रशासनाने पाहणी केलेल्या पाच जमिनी या पंचकोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मशिदीच्या उभारणीसाठी मुस्लीम पक्षकारांना नवीन जागा देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पाच जागांची पाहणीही करण्यात आली आहे. मात्र जो अयोध्याचा पवित्र प्रदेश मानला जातो, त्या प्रदेशाच्या बाहेर जमिनी आहेत. पंचकोशी परिक्रमा हा 15 किमीचा परिघ आहे. सध्या प्रशासनाने पाहणी केलेल्या पाच जमिनी या पंचकोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अयोध्या प्रशासनाने मशिदीसाठी मलिकपुरा मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर या गावांची पाहणी केली आहे. या सर्व जमिनी अयोध्यापासून वेगवेगळ्या शहरांना जोडणार्‍या मुख्य रस्त्यावर आहेत. सर्वांच्या संमतीनंतर सरकार ही जमीन मुस्लीम पक्षकारांच्याच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून काही अटी शर्तीच्या आधारावर ती हिंदुंना मिळणार असल्याचा निकाला न्यायालयाने दिला होता.

सोलापूर झेडपीत भाजपच्या पाठिंब्याने सेनेचा अध्यक्ष

त्यानंतर, मुस्लिम बाजूने मशिदीसाठी जमीन घेण्याबाबत एकमत नाही. काही दिवसांपूर्वी अयोध्या प्रकरणाशी संबंधित पक्षांमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी संबंधित पक्षांनी सांगितले होते की त्यांना पाच एकर जमीन नको आहे. मात्र, अयोध्या प्रकरणाशी संबंधित मुख्य पक्षाचा हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी हे जमीन घेण्याच्या बाजूने होते.

सत्तासमतोलाचा विस्तार; नव्या चेहऱ्यांनाही संधी

तत्पूर्वी, मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला होता. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले होते. तर, नव्या मशिदीसाठी अयोध्येबाहेर सरकारच्या वतीनं पाच एकरची जागा देण्यात यावी असे सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh govt identifies plots for Ayodhya mosque