जोरदार पावसाचे "यूपी'त 49 बळी

in Uttar Pradesh Heavy rains 49 victims
in Uttar Pradesh Heavy rains 49 victims

लखनौ : दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. उत्तर प्रदेशात पाऊस, वादळ आणि वीज पडण्यामुळे 58 लोकांचा मृत्यू झाला असून, अन्य 53 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दिल्लीत यमुना नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या खालील भागात पुराचा धोका वाढला आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्येही अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

उत्तर प्रदेशच्या विविध भागांत गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे 49 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 11 मृत्यू सहारनपूर येथे झाले आहेत. बचाव आयुक्त कार्यालयाच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून आतापर्यंत 49 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विविध भागांतून मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा आणि मेरठ येथे प्रत्येकी सहा, मैनपुरी येथे चार, कासगंजमध्ये तीन, बरेली, बागपत आणि बुलंदशहरमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी कानपूर ग्रामीण, मथुरा, गाजियाबाद, हापुड, रायबरेली, जालौन, जौनपूर, प्रतापगड, बांदा, फिरोजाबाद, अमेठी, कानपूर नगर तसेच मुजफ्फरनगर येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने येत्या सोमवारपर्यंत राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com