esakal | 'ए मिस्टर वॉरंट दाखवं', संतप्त प्रियंका गांधींनी पोलिसांना सुनावलं | Priyanka gandhi
sakal

बोलून बातमी शोधा

'ए मिस्टर वॉरंट दाखवं', संतप्त प्रियंका गांधींनी पोलिसांना सुनावलं

'ए मिस्टर वॉरंट दाखवं', संतप्त प्रियंका गांधींनी पोलिसांना सुनावलं

sakal_logo
By
दीनानाथ परब

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखीमपूर खीरीच्या तिकुनिया (Lakhimpur Kheri violence) भागात झालेल्या हिंसाचाराने राजकीय वातावरण तापले आहे. आठ शेतकऱ्यांच्या मृत्यू (farmers death) झाल्याने उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर चौफेर टीका सुरु आहे. या दुर्देवी घटनेमुळे उत्तर प्रदेशचं राजकारण ढवळून निघालं असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (priyanka gandhi) लखीपूरला पोहचल्या आहेत. सोमवारी पहाटे प्रियंका गांधी लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागाकडे निघाल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं. त्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी प्रियंका गांधींची पोलिसांबरोबर शाब्दीक बाचाबाची झाली. दबावतंत्राचा वापर करणाऱ्या पोलिसांना प्रियंका गांधींनी चांगलंच सुनावलं. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. "ए मिस्टर महिलांशी बोलू शकत नाही पण याला मारताय. मला ऑर्डर दाखवा, वॉरंट दाखवा, वॉरंट नसेल तर तुम्हाला मला रोखण्याचा काहीही अधिकार नाही" असे प्रियंका गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितले.

हेही वाचा: चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात 'किसींग'ने का होते?

"तुम्ही मला रोखताय पण आधी कायदेशीर बाबी पूर्ण करा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही लोकांना मारु शकता, शेतकऱ्यांना चिरडू शकता, आमच्या बरोबरही असंच वागणार" असे संतप्त झालेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या. "तुम्ही जबरदस्ती घेरलंत. ढकलल. तुम्ही मारहाणीचा प्रयत्न केला. अपहरणाचा प्रयत्न केला. विनयभंगाचा प्रयत्न केलात. हात लावून दाखवा. तुमचे अधिकारी, मंत्र्यांकडे जाऊन वॉरंट घेऊन या. महिलांना पुढे करु नका. तुमच्या प्रदेशात कायदा नसेल. पण या देशात कायदा आहे" असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

हेही वाचा: हम तो डूबेंगे.. लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’- खडसे

प्रियंका गांधी काय म्हणाल्या?

खूप महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहे तरीही सरकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. सुरवातीपासून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांना संपून टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्याच राजकारण करत आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. हा देश भाजपच्या विचारधारेवर चालणारा देश नाही. या देशाला शेतकऱ्यांनी बनवल आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाले की जेव्हा सरकार आणि पोलीस शक्तीचा वापर करत असते तेव्हा त्यांची नैतिकता संपलेली असते. मी माझ्या घरातून बाहेर पडून कोणताही अपराध करणार नाही. मी फक्त मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात आहे.

loading image
go to top