Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Amroha Crime News: आपल्या आईसोबत झोपलेल्या मुलाचे अपहरण करून जंगलात त्याचे गुप्तांग आणि नाक कापण्यात आले. पोलिसांनी जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
Brutality With Innocent Boy

Brutality With Innocent Boy

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील दिदाउली पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला धक्का देणारी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. गावात आपल्या आईच्या शेजारी झोपलेल्या एका निष्पाप मुलाचे अपहरण करून त्याला जंगलात नेण्यात आले. त्याच्यावर अत्यंत क्रूर अत्याचार करण्यात आले. आरोपीने मुलाचे गुप्तांग आणि नाक कापले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई केली. काल रात्री एका चकमकीनंतर मुख्य आरोपीला अटक केली, ज्यामध्ये त्याच्या पायात गोळी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com