आता ‘इस्रो’च्या सगळ्या मोहिमा यशस्वी होणार? मिळाला ‘छप्पन्नभोग’ नैवेद्य!

टीम ई-सकाळ
Friday, 13 September 2019

आता इस्रोच्या पुढच्या सगळ्या मोहिमा यशस्वी होणार आहेत. कारणही तसच आहे. मथुरेतील एकाने इस्रो संस्थेला ५६ पदार्थांचा नैवेद्य दिला आहे आणि इस्रोच्या सर्व मोहिमांच्या यशासाठी प्रार्थना केली आहे.

मथुरा : भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात अपयशी ठरल्याने सगळ्यांचीच निराशा झाली. चंद्राभोवती फिरणार ऑर्बिटरमधून बाहेर पडणाऱ्या विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. चंद्रापासून दोन किलोमीटर उंचीवर लँडर आणि इस्रो मुख्यालय यांच्यात संपर्क न झाल्यानं इस्रो शास्त्रज्ञांबरोबरच तमाम भारतीयांच्या पदरी निराशा आली.

आणखी वाचा : विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत मनसेचे ठरता ठरेना!

विज्ञान आणि वैवेद्य
आता इस्रोच्या पुढच्या सगळ्या मोहिमा यशस्वी होणार आहेत. कारणही तसच आहे. मथुरेतील एकाने इस्रो संस्थेला ५६ पदार्थांचा नैवेद्य दिला आहे आणि इस्रोच्या सर्व मोहिमांच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. सोशल मीडियावर या प्रकारावर टीका केली जात आहे. मुळात इस्रो ही विज्ञान संशोधन संस्था आहे. या संस्थेला अशा पद्धतीने शुभेच्छा देण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. काहींनी ही विज्ञानाची थट्टा असल्याचे म्हटले आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे छप्पनभोग कार्यक्रमाला इस्रोतील एक संशोधक के. सिद्धार्थ उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भूवया उंचवाल्या आहेत.

आणखी वाचा : छत्तीसचा आकडा असणाऱया रामराजेंनी उदयनराजेंना का दिल्या शुभेच्छा

काय आहे ‘छप्पन्नभोग’ परंपरा?
हिंदू धर्मामध्ये देवाला प्रसन्न करण्यासाठी ५६ भोग हा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये ५६ वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करून, त्याचा नैवेद्य केला जातो. उत्तर भारतात ही प्रथा लोकप्रिय आहे. यामध्ये भातापासून डाळ, दही, पुरी, फळांसह विविध मिष्ठान्नांचा समावेश असतो. या पदार्थांमध्ये गोड, कडू, आंबट, तिखट, खारट, तुरट सगळ्या चवींचे पदार्थ असणे अपेक्षित आहे. श्रीकृष्णाला हा ५६भोग आवडत असल्याची भाविकांची धारणा आहे. उत्तर भारतात श्रीकृष्णाला जन्माष्टमीच्या वेळी हा नैवेद्य दाखवला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण दिवस कृष्णाचं नामस्मरण केल्यानंतर सायंकाळी हा नैवेद्य दाखवला जातो.

आणखी वाचा : खुद्द मुख्यमंत्री फडणवीस उदयनराजेंना घेऊन जाणार दिल्लीला

श्रीकृष्ण आणि ‘छप्पन्नभोग’ परंपरा
श्रीमद्भागवत महापुराणात ‘छप्पन्नभोग’चा उल्लेख आहे. मथुरेतील गोपिका श्रीकृष्णावर प्रेम करत होत्या. त्यांना पतीच्या रुपाने श्रीकृष्णच हवा होता. त्यासाठी त्यांनी कात्यायनीची पूजा केली होती. यमुनेत स्नान केल्यानंतर त्यांनी कात्यायनीची पूजा करून तिला, ‘छप्पन्नभोग’ वैवेद्य दाखवला होता, असा उल्लेख महापुराणात आहे. त्यानंतर श्रीकृष्णाला ‘छप्पन्नभोग’ वैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

आणखी वाचा : हाती 'शिवबंधन' बांधल्यानंतर, मिलिंद नार्वेकरांविषयी काय म्हणाले...

इथे दाखविला ‘छप्पन्नभोग’!
मथुरा येथील प्रख्यात ‘छप्पन्नभोग’ यंदा भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) अर्पण करण्यात आला आहे. या संस्थेला भविष्यातील मोहिमांना बळ मिळावे, ही सदिच्छा त्यामागे असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक आणि श्री गिरिराज सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष मुरारी अग्रवाल यांनी सांगितले. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ के. सिद्धार्थ या वेळी कुटुंबीयांसह उपस्थित होते. ‘छप्पन्नभोग’द्वारे विविध 56 पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. यंदा 21 हजार किलोंचा प्रसाद तयार करण्यात आला होता. लखनौ, आग्रा, हाथरस, इंदूर, रतलाम आणि मदुराईहून आलेल्या बल्लवाचार्यांनी तो तयार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh mathura chappan bhog to isro for its upcoming missions